तुकोबांच्या अभंगाचे लेखन करणारे श्री संत संताजी महाराज जगनाडे !
वयाच्या ७६ व्या वर्षी मार्गशीर्ष वद्य १३ ला संताजी महाराजांचे निधन झाले. निधनानंतरच्या निघालेल्या अंत्ययात्रेत भजनांच्या दिंड्या चालत होत्या. त्यांच्या देहावर हार, फुले, गुलाल, व पैशाची उधळण होत होती. विठ्ठल नामाच्या जयघोषात त्यांना निरोप देण्यात येत होता. स्थळाची शुद्धी करूण खड्डा खणुन त्यामध्ये बेलपत्रे, तुळशीपत्रे चंदन घालुन त्यावर मीठ घातले लाकडी पाटावर संताजी महाराजांचा मृतदेह बसविला नवे वस्त्र अंगावर घालुन पुजेचे साहित्य ठेवून गळ्यापर्यंतचा त्यांचा देह मिठाने झाकला. व आलेल्या सर्व भाविकांनी हरिनामाच्या गजरात त्यांच्यावर मुठमाती टाकली अशी बरीच माती टाकली तरी त्यांचा चेहरा न बुझता उलट तेजस्वी दिसु लागला. परंतु बऱ्याच वेळाने काही लोकांच्या लक्षात आले की तुकाराम महाराजांनी संताजी महाराजांना वचन दिले होते की तुझ्या अंत्यसमयी तुला शेवटचे दर्शन देण्याकरिता व तुला माझ्या हस्ते मुठमाती देण्यासाठी मी जरूर येईल. अशा प्रकारचे बोलणे आठवल्यानंतर माती टाकणे बंद केले. पहाटे पहाटे प्रकाशाचा एक मोठा किरण चमकला आणि काही क्षणातच तुकाराम महाराज प्रगट झाले. आणि पांडुरंगाचा जयघोष करीत ते संताजी महाराजांच्या देहापाशी गेले. संताजी महाराजांच्या देहावर तीन मुठी माती टाकली आणि काय चमत्कार संताजी महाराजांचे शिरकमल पुर्ण झाकले गेले. पांडुरंग पांडुरंग म्हणत तुकाराम महाराज अदृश्य झाले पण जाते वेळेस त्यांनी संताजी महाराजांनबद्दल म्हंटले की.
चारीता गोधन | माझे गंतले वचन ॥ आम्हा येणे झाले । एका तेलीया कारणे ॥ मुठी मृतितका देख | तेव्हा लोपविले मुख ॥ आलो म्हणे तुका । संतु न्याव्या विष्णु लोका ॥ संताजी महाराज समाधिस्त झाल्यापासन चाकण, खेड, कडुस, पुणे शहर व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मार्गशिर्ष वद्य १३ ला. अनेक भावीक तेथे जातात. व सर्व ग्रामस्थांच्या मदतीने उत्सव साजरा करतात. त्यावेळी भजन किर्तन व प्रसादाच्या माध्यमातुन भोजनाचा कार्यक्रम ठेवला जातो.
तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी संताजी महाराज हे एक असले तरी तुकारामाच्या खांद्याला खांदा लावुन बरेच कार्य संताजी महाराजांनी केलेले आहे. अनेक प्रकारच्या अभंगाची रचना त्यांनी केलेली आहे. संताजी हे भक्तीमार्गी होते हे यावरून सिद्ध होते. संताजी महाराज हे तुकाराम महाराजांच्या सानिध्यात सतत रहात असल्यामुळे त्यांनाही पांडुरंगाचा साक्षात्कार झाला होता. आपल्या निस्मीम भक्तीमुळे त्यांच्या अंत्यसमई वैकुठवासी झालेल्या तुकाराम महाराजांना मृत्युलोकी परत यावे लागले हे सर्व साक्षी सत्य आहे. त्याचे कार्य सर्व समाज बंधु-भगिनींनी असेच पुढे नेयुन जय संताजी फक्त ओठातुन न बोलता ते पोटातुन निघावे एवढीच श्री संताजी चरणी प्रार्थना !!! ॥ जय संताजी ॥ ॥ जय तेली समाज ॥