श्री संत संताजी जगनाडे यांना लिखान करण्याची खूप आवड होती. तुकाराम महाराजांकडून प्रेरणा घेऊन त्यांची आपल्या वैचारिक लिखानांचा श्री गणेशा सुरू केला होता. बालवयातच परमार्थचे बाळकड़ मिळाल्याने त्यांच्या लेखनीस धार निर्माण झाली होती. समाज जागृतीसाठी जे साहित्य आवश्यक आहे त्यावर त्यांनी भर दिला. संत तुकाराम महाराज यांची गाथा लिहिण्यास त्यांनी पुढाकारच घेतला नाही तर ही मौल्यवान साहित्य संपत्तीचे. त्यांनी जीवापार सांभाळली. तुकारामांचे साहित्य लिहिता लिहिता संताजींनी दोन अद्वितीय विचारांच्या ग्रंथाची निर्मिती केली. त्यात सिंधू व शंकर दीपिका हे दोन ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाचे साहित्य आहे.
संताजीच्या हस्तअक्षरातील ४ वह्या (बाड) आजही उपलब्ध आहे. तळेगाव येथील त्यांच्या वारसाकडे त्यांचे जतन करून ठेवले आहे. संताजी महाराज तेलाचा घाणा हाकत काव्य करत होते. काव्य बोलणे व त्याचे लिखाण करणे त्यांना आवडत होते. त्यांच्या या विचारातून असे दिसते की कोणत्याही कामाचा ध्यास घेतला तर आपण ते इच्छा शक्तीच्या जोरावर यशस्वी करू शकतो. त्यासाठी कष्ट साधनेची गरज असते. बालवयातच संताजीने ध्येयाचा ध्यास घेतला होता. त्यामुळे ध्येयवाद व आदर्शाचे पडसाद उमटत गेले.