श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची ओळख
संतांचे कार्य मानवजातीच्या कल्याणासाठी असते. श्री संत संताजी महाराज हे एक महान संत होऊन गेले समाज सुधारणेचे काम ही त्यांनी केले हे सर्व आपणास माहितच आहे.
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. वडील विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे श्री संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांना हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे श्री संताजी महाराजांनी देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे श्री संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही. श्री संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. त्यांना कीर्तनाला भजनाला जाण्याची आवड लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चवदा टाळकऱ्या पैकी एक झाले.
त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून प्रभोधन देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा श्री संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा श्री तुकाराम महाराज श्री संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून श्री संताजींवर तुकाराम महाराजांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा संत श्री तुकारामांनी श्री संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून श्री संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी संत तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली. शेवटच्या क्षणी समाधीवर माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी श्री संताजीना दिले होते. परंतु तुकाराम महाराज हे श्री संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की, जेव्हा श्री संताजीचे देहावसान झाले तेव्हा अंत्य संस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही श्री संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते,त्यांचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर श्री संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.
श्री संत संताजी महाराज समाधी
श्री संत संताजी महाराज मंदिर
श्री संत संताजी महाराज समाधी
०१ तेली समाज का इतिहास श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची ओळख?
०२ महाराज ८ डिसेंबर रोजी श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती. यानिमित्त त्यांच्या विचारकार्याची ही धावती ओळख?
०३ श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच बालपण
०४ श्री संत संताजी महाराज जगनाडे गुरुभेट
०५ श्री संत संताजी महाराज जगनाडे गाथांचे पुनर्लेखन
कार्यक्रम पत्रिका आषाढी वारी २०२२ श्री क्षेत्र सुदुंबरे, ते श्री क्षेत्र पंढरपुर श्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा
श्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका ( सुदुंबरे ते पंढरपुर ) २०२२ श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा
ताज्या बातम्या नेहमीच शीर्षस्थानी असतात
श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जीवन गाथा
(अंदाजे इ.स. १६२४ – इ.स. १६८८) हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे – अर्थात तुकाराम गाथेचे – लेखनिक होते. महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळ पंढरपुर
सर्व वारकरी समाजबांधव देणगीदार अन्नदाते यांना कळवीण्यात आनंद होतो आहे की, पंढरपूर येथील नेण्याचे ठरविले आहे. तरी आपणास विनंती आहे की श्री संताजी महाराजांच्या चरणी आपला सेवा रुजू बांधकाम करण्याचा संकल्प श्री. शिवदास उबाळे अध्यक्ष संदबरे संस्था व सर्व पालखी सोहळा मंडळ पूर्णत्वास करण्यासाछी आर्थिक सहकार्य करावे. ही नम्र विनंती.
टिप:- देणगीदार बंधू भगिनांना आपली देणगी चेक / ऑनलाईन / बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा
मार्केट वार्ड (पुणे) ४११०३७ - ४०११४० पुणे SSI Branch, IFSC Code MAHB0001140 श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळ A/c no. 60347341042 वर पाठवावी ही नम्र विनंती