santaji maharaj

सुदुंबरे समाधी मंदिर व पंढरपूर पालखी सोहळा

श्री क्षेत्र सुदुंबरे दर्शन माहिती, मंदिर मूळ छायाचित्रे आणि आषाढी वारी सोहळा

सुदुंबरे समाधी मंदिर स्थान व महत्त्व

श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या पवित्र गावी स्थित आहे. सुदुंबरे हे संत संताजींचे जन्मस्थान आणि समाधी स्थान आहे.

 

इथल्या शांत व निसर्गरम्य वातावरणात बांधलेले हे मंदिर वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. मंदिरात संत संताजी महाराजांची मनमोहक मूर्ती व पवित्र समाधी स्थापित आहे. दरवर्षी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला येथे भव्य पुण्यतिथी उत्सव साजरा होतो.

clock (2)

दर्शन वेळ (Timings)

सकाळी ५:०० ते रात्री ९:००
काकड आरती: सकाळी ५:३०
महापूजा व आरती: दुपारी १२:००
हरिपाठ व शेजारती: रात्री ८:००

map

कसे पोहोचावे? (How to Reach)

रस्त्याने: पुणे-मुंबई जुना महामार्ग तळेगाव किंवा चाकण येथून सुदुंबरे जवळ आहे.
रेल्वे: तळेगाव रेल्वे स्टेशन (१० किमी).

Shri Sant Santaji Maharaj Samadhi, Sudumbare

सुदुंबरे समाधी मंदिर परिसर

पवित्र समाधी मंदिर, ध्यान मंडप व चक्रेश्वर मंदिराचा परिसर भक्तांना आत्मिक शांती देतो.

संताजी महाराजांचे समाधीगमन

वयाच्या ७६व्या वर्षी, मार्गशीर्ष वद्य १३ या दिवशी संताजी महाराजांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर निघालेल्या अंत्ययात्रेत भजनांच्या दिंड्या सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या देहावर हार, फुले, गुलाल तसेच पैशांची उधळण करण्यात येत होती. विठ्ठल नामाच्या जयघोषात भक्तिभावाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

संताजी महाराजांची समाधी

अंत्यसंस्कारासाठी स्थळाची शुद्धी करून तेथे खड्डा खणण्यात आला. त्या खड्ड्यामध्ये बेलपत्रे, तुळशीपत्रे व चंदन ठेवून त्यावर मीठ घालण्यात आले. त्यानंतर लाकडी पाटावर संताजी महाराजांचा देह बसविण्यात आला. त्यांच्या अंगावर नवीन वस्त्र परिधान करण्यात आले आणि पूजेचे साहित्य ठेवण्यात आले.

 

गळ्यापर्यंतचा त्यांचा देह मिठाने झाकण्यात आला. उपस्थित असलेल्या सर्व भाविकांनी हरिनामाचा गजर करत त्यांच्या देहावर मुठमाती टाकण्यास सुरुवात केली. बरीच माती टाकूनही संताजी महाराजांचा चेहरा झाकला जात नव्हता; उलट त्यांचा चेहरा अधिक तेजस्वी दिसू लागला.

तुकाराम महाराजांचे वचन

बराच वेळ झाल्यानंतर काही भाविकांच्या लक्षात आले की, तुकाराम महाराजांनी संताजी महाराजांना एक वचन दिले होते तुझ्या अंत्यसमयी तुला शेवटचे दर्शन देण्यासाठी आणि तुला माझ्या हस्ते मुठमाती देण्यासाठी मी नक्की येईन.

 

हे वचन आठवल्यानंतर संताजी महाराजांवर माती टाकणे थांबविण्यात आले.

 

पहाटेच्या वेळी अचानक प्रकाशाचा एक मोठा किरण चमकला आणि काही क्षणांतच तुकाराम महाराज प्रगट झाले. पांडुरंगाचा जयघोष करीत ते संताजी महाराजांच्या देहापाशी गेले. त्यांनी संताजी महाराजांच्या देहावर तीन मुठी माती टाकल्या आणि एक अद्भुत चमत्कार घडला संताजी महाराजांचे शिरकमल पूर्णपणे झाकले गेले.

“पांडुरंग! पांडुरंग!” असा जयघोष करीत तुकाराम महाराज अदृश्य झाले. जाताना त्यांनी संताजी महाराजांविषयी पुढील शब्द उच्चारले—

चारीता गोधन । माझे गंतले वचन ॥
आम्हा येणे झाले । एका तेलीयासाठी कारणे ॥
मुठी मृत्तिकेचा देख । तेव्हा लोपविले मुख ॥
आलो म्हणे तुका । संतु न्याव्या विष्णुलोका ॥

संताजी महाराजांचा स्मृतिउत्सव

संताजी महाराज समाधिस्त झाल्यापासून चाकण, खेड, कडूस, पुणे शहर तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मार्गशीर्ष वद्य १३ या दिवशी अनेक भाविक त्यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी येतात.

 

सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या दिवशी भक्तिभावाने उत्सव साजरा केला जातो. भजन, कीर्तन, हरिनामाचा गजर तसेच प्रसादाच्या माध्यमातून भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या उत्सवातून संताजी महाराजांच्या भक्ती, कार्य आणि विचारांचे स्मरण केले जाते.

संताजी महाराजांचा स्मृतिउत्सव

संताजी महाराज समाधिस्त झाल्यापासून चाकण, खेड, कडूस, पुणे शहर तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मार्गशीर्ष वद्य १३ या दिवशी अनेक भाविक त्यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी येतात.

 

सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या दिवशी भक्तिभावाने उत्सव साजरा केला जातो. भजन, कीर्तन, हरिनामाचा गजर तसेच प्रसादाच्या माध्यमातून भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या उत्सवातून संताजी महाराजांच्या भक्ती, कार्य आणि विचारांचे स्मरण केले जाते.

संताजी महाराजांचा वारसा

संताजी महाराजांचे कार्य, भक्ती, अभंग आणि समाजासाठी दिलेले योगदान पुढील पिढ्यांनीही जपणे आवश्यक आहे. त्यांचे नाव केवळ ओठांवर न राहता त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श आपल्या आचरणात उतरावा, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.

॥ जय संताजी ॥
॥ जय तेली समाज ॥

वार्षिक आषाढी वारी

श्री संत संताजी जगनाडे महाराज पालखी सोहळा (सुदुंबरे ते पंढरपूर)

दरवर्षी आषाढी वारीनिमित्त सुदुंबरे येथून श्री संताजी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होते.

man-walking

पालखी प्रस्थान

श्री क्षेत्र सुदुंबरे येथून विठ्ठल नामाच्या गजरात वारीचे प्रस्थान.

drum

दिंडी व रिंगण सोहळा

टाळ-मृदुंगाच्या गजरात, भजनाने आणि अश्वांच्या रिंगणाने मार्ग दुमदुमतो.

chinese-temple

पंढरपूर आगमन

आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा तीरावर पालखीचे आगमन.

Scroll to Top